आसू - फलटण तालुक्यातील 102 ग्रामपंचायत निवडणुक बिगूल

आसू - फलटण तालुक्यातील 102 ग्रामपंचायत निवडणुक बिगूल

Published on

फलटणमधील १०२ गावांत मोर्चेबांधणीला वेग

प्रभाग रचनेचे आदेश धडकले; राजे गट विरुद्ध खासदार गट असा पुन्हा सामना

आसू, ता. २१ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा धुरळा शांत होतो न होतो, तोच फलटण तालुक्याच्या ग्रामीण राजकारणात पुन्हा एकदा एका महासंग्रामाची ठिणगी पडली आहे. तालुक्यातील एकूण १३१ ग्रामपंचायतींपैकी तब्बल १०२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल येत्या काही दिवसांत वाजणार असून, प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.
राज्य शासनाकडून ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचे अधिकृत आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. येत्या काही दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यामध्ये जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसह, यापूर्वी मुदत संपून प्रशासकराज असलेल्या गावांचाही समावेश आहे. या बातमीमुळे गावपातळीवरील राजकीय वातावरण अचानक तापले आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने फलटण तालुक्यात पुन्हा एकदा पारंपरिक राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. आमदार रामराजे नाईक निंबाळकर (राजे गट) आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (खासदार गट) यांच्यात हा सामना रंगणार आहे. तालुक्यातील वर्चस्व टिकवण्यासाठी दोन्ही गटांसाठी या निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरणार आहे.
या निवडणुकीत तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि मोठ्या समजल्या जाणाऱ्या कोळकी, साखरवाडी, गुणवरे, आसू, तरडगाव आणि होळ यांसारख्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या मोठ्या ग्रामपंचायती ज्या गटाच्या ताब्यात जातील, त्याचे तालुक्याच्या राजकारणावरील वर्चस्व सिद्ध होणार आहे. यावेळी सरपंच निवडी थेट जनतेतून होणार असल्याने या निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सरळ लढतीमुळे गावागावांतील स्थानिक आघाड्या, गट-तट आणि प्रस्थापित नेत्यांची कसोटी लागणार आहे. इच्छुकांनी आतापासूनच गाठीभेटी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू केली आहे.


-----------------

२२ फेब्रुवारी २०२६ रोजी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती
साखरवाडी, तांबवे, कोळकी, पिराचीवाडी, खुंटे, भिलकटी, जाधववाडी (फ), अलगुडेवाडी, सोनवडी खु., तिरकवाडी, सासकल, डोंबाळवाडी, शेरेशिंदेवाडी, सस्तेवाडी, घाडगेवाडी, कापडगाव, निरगुडी, रावडी बु., वाघोषी, जिती, कापशी, धुमाळवाडी, मुळीकवाडी, काशिदवाडी, फरांदवाडी, घाडगेमळा, कुरवली बु., शिंदेनगर, ठाकुरकी, नांदल, सरडे, सांगवी, राजुरी, तावडी, जावली, खामगाव, हिंगणगाव, मुंजवडी, साठे, खराडेवाडी, मलवाडी, तडवळे, विचुर्णी, वडगाव, निंबळक, मिरढे, कोरेगाव, मुरूम, शेरेचीवाडी ढ., भाडळी बु., भाडळी खु., टाकळवाडे, ढवळ, आंदरूड, रावडी खु., आरडगाव, शिंदेवाडी, नाईकबोमवाडी, कांबळेश्वर, धुळदेव, निंभोरे, काळज, बिबी, हणमंतवाडी, बोडकेवाडी, होळ, सोनगाव, वडजल, फडतरवाडी, आळजापूर, राजाळे, गुणवरे, वाखरी, सोनवडी बु., ढवळेवाडी नि., झिरपवाडी, पवारवाडी, शेरेचीवाडी (हिं.), कोऱ्हाळे , जाधववाडी (ता.).

-------------

प्रशासक असलेल्या ग्रामपंचायती
तरडगाव (१८ मार्च २०२४), खडकी (१९ मार्च २०२४), गोखळी (१९ मार्च २०२४), माळेवाडी (१९ मार्च २०२४), चांभारवाडी (२२ मार्च २०२४), दालवडी (२३ मार्च २०२४), विठ्ठलवाडी (२३ मार्च २०२४), शिंदेमाळ (२४ मार्च २०२४), सासवड (२४ मार्च २०२४), टाकोबाईचीवाडी (२६ मार्च २०२४), ढवळेवाडी आसू (२७ मार्च २०२४), मिरगाव (२७ मार्च २०२४), मिऱ्याचीवाडी (दा.) (२९ मार्च २०२४), आसू (०२ एप्रिल २०२४), खटकेवस्ती (११ मे २०२४), उळुंब (०३ डिसेंबर २०२४), माझेरी (०१ जानेवारी २०२५), गोळेवाडी (०३ जानेवारी २०२५), परहर खु. (७ जानेवारी २०२५), जोर पुन. (वाखरी) (१४ फेब्रुवारी २०२५), गोळेगाव पु. (ठाकुरकी) (२३ फेब्रुवारी २०२५), जोर पुन. (कुरवली
खु) (२६ फेब्रुवारी २०२५).


-------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com