

PNE26W44255 -
सोलापूर : परिवार दिवसानिमित्त जैन समाजाच्या चारही पंथांचे अध्यक्ष एकत्र आले असताना.
संघटित समाज घडवण्यासाठी ‘परिवार दिवस’ उत्साहात
जैन सोशल ग्रुपचा उपक्रम; चारही पंथांचे अध्यक्ष उपस्थित
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २३ : समाजातील एकता, सेवा आणि संस्कारांची वीण अधिक घट्ट करून संघटित समाज घडवण्याच्या उद्देशाने जैन सोशल ग्रुपतर्फे ‘फेडरेशन डे’ अर्थात ‘परिवार दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. तुळजापूर वेस येथील पूज्य साध्वी मनोहरनगर जैन स्थानकात झालेल्या कार्यक्रमाला जैन समाजाच्या चारही पंथांच्या अध्यक्षांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात साध्वी अक्षयश्री (आखाजी) म. सा. यांच्या मंगलाचरणाने झाली. परिवार दिवसाच्या माध्यमातून सदस्यांमधील एकोपा वाढवणे, सेवाभावाला प्रोत्साहन देणे आणि संघटनशक्ती समाजहितासाठी उपयोगात आणणे, हा संदेश देण्यात आला.
यावेळी जैन समाजाच्या चारही पंथांचे अध्यक्ष सुनील गांधी, पदमचंद राका, मोहनलाल कोचर व विजय डाकलिया, तसेच जैन सोशल ग्रुपचे इंटरनॅशनल डायरेक्टर उन्मेशजी कर्णावत, झोन को-ऑर्डिनेटर गौतमजी छाजेड व रिजन कमिटी कन्व्हीनर अभयजी गांधी उपस्थित होते. संघटनशक्ती केवळ एकत्र येण्यापुरती मर्यादित न राहता समाजसेवेसाठी कार्यरत झाली, तर त्यातून समाजासाठी प्रेरणादायी कार्य उभे राहते, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला. सूत्रसंचालन ईशा कर्णावत यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.