पोलिस ठाण्यात कौटुंबिक वाद थांबविण्यावर चर्चा

पोलिस ठाण्यात कौटुंबिक वाद थांबविण्यावर चर्चा
Published on

वळसंगकर कुटुंबातील वादावर
पोलिसांचा सामोपचाराचा प्रयत्न
पती अन् सासु यांनी मागितला दोन दिवसांचा वेळ
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २५ : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतरही कुटुंबातील कलह वाढतच चालला आहे. गुरुवारी सून डॉ. शोनाली, त्यांच्या सासू डॉ. उमा आणि पती डॉ. अश्विन हे पोलिस ठाण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांच्यात कौटुंबिक वाद मिटविण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. यावेळी डॉ. उमा व डॉ. अश्विन यांनी दोन दिवसांचा वेळ मागितल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हा वाद सामोपचाराने मिटावा यासाठी पोलिसांकडून संवेदनशिलतेने प्रयत्न सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सांगितले.
सून डॉ. शोनाली या हॉस्पिटलवरील घरात रहायला गेल्यावर डॉ. शिरीष वळसंगकर यांचे जावई सुजय फडके यांनी १८ जून रोजी त्यांना जबरदस्तीने घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर दोघांनीही एकमेकांविरुद्ध सदर बझार पोलिसांत तक्रारी केल्या आहेत. त्यातून मृत डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या कुटुंबातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. घरातून जबरदस्तीने बाहेर काढताना फडके यांनी डॉ. शोनाली यांना दमदाटी केली. मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्यांच्याविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी डॉ. शोनाली यांनी पोलिसांकडे अर्जाद्वारे केली होती. बुधवारी (ता. २४) यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घातले आणि कौटुंबिक वाद आपापसांत मिटविण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार गुरुवारी (ता. २५) पुन्हा डॉ. शोनाली सदर बझार पोलिसांत आल्या होत्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्यासमोर त्यांनी आपले म्हणणे मांडले. त्यावेळी तेथे त्यांचे पती डॉ. अश्विन व सासू डॉ. उमा वळसंगकर या देखील उपस्थित होत्या. यावेळी तक्रारी अर्जाऐवजी कौटुंबिक वाद मिटवून घेण्यासंदर्भात चर्चा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com