जमिनीच्या वादातून मोई येथे गोळीबार

जमिनीच्या वादातून 
मोई येथे गोळीबार
Published on

कुरुळी, ता. २६ : जमिनीच्या वादातून चुलत नातवाने साथीदारांसह मिळून आजोबांच्या घरावर हल्ला चढवला. यावेळी दोन महागड्या गाड्यांची तोडफोड करत पिस्तुलातून गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना मोई (ता. खेड) येथे शुक्रवारी (ता. २६) सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली.
याप्रकरणी सुरेश विष्णू गवारी (वय ६०, रा. मोई) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून आशिष नंदू गवारी (वय २१, रा. बिजलीनगर, चिंचवड) आणि त्याच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश गवारी हे मोई येथील मुक्ताई मंदिराजवळ कुटुंबासह राहतात. त्यांचा चुलत नातू आशिष याच्याशी वडिलोपार्जित जमिनीवरून वाद सुरू आहे. याच कारणातून शुक्रवारी सकाळी आशिषने २० ते २५ वयोगटातील चार साथीदारांसह गवारी यांच्या घरासमोर येत गोंधळ घातला. आरोपींनी तेथे उभ्या असलेल्या एक्सयूव्ही ७०० आणि क्रेटा या दोन मोटारींवर दगडफेक करून त्यांचे नुकसान केले. तसेच आशिषने त्याच्याकडील पिस्तुलातून सुरेश गवारी यांच्या दिशेने गोळी झाडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून महाळुंगे पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com