CoronaVirus : जनता कर्फ्यूत दिसली अशीही माणूसकी

Family Stuck in the ST station at bhosari in Janta curfew
Family Stuck in the ST station at bhosari in Janta curfew

भोसरी : भोपाळमधील एक कुटुंब नाशिकला जाण्यासाठी भोसरीत येते मात्र, जनता कर्फ्यूमुळे सर्व एसटी बस बंद असल्याने भोसरीतील एसटी स्थानकात अडकून पडते. कर्फ्यूमुळे हॅाटेल व इतर दुकाने बंद असल्याने कुटुंब अडचणीत अडकते मात्र, भोसरीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. तसेच बीआरटीएस टर्मिनलमध्ये राहण्यासाठीचेही सहकार्य मिळाल्याने या कुटुंबाला कर्फ्यूतही माणूसकीचे दर्शन घडले.

भोपाळमधून नाशिकला जाण्यासाठी राघूसिंग भूरिया यांचे दहा जणांचे कुटुंब कासारवाडीतील नाशिक फाट्यावर सकाळी उतरले. तेथे एसटी स्थानकावर बराच वेळ थांबल्यानंतरही एसटी न आल्याने हे कुटुंब भोसरीतील एसटी स्थानकात दुपारी बारा वाजता आले. जनता कर्फ्यूमुळे एसटीसह सर्वच दुकाने आणि व्यवहार बंद असल्याचे कळले. त्यामुळे दोन लहान मुले, महिला आणि पुरुष मंडळींच्या चिंतेत वाढ झाली.

हॅाटेलही बंद असल्याने जेवणाचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला. या कुटुंबाची बीआरचीएस टर्मिनलचे वाहतूक नियंत्रक काळूराम लांडगे यांनी विचारपूस केली. सामाजिक कार्यकर्ते राहूल ज्ञानेश्वर गवळी आणि किशोर गवळी यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. तर सामाजिक कार्यकर्ते संतोष जगताप यांनी चहाची व्यवस्था केली. लांडगे यांनी पाण्याची व्यवस्था करून दिली. तर रात्रीच्या वेळेस बीआरटीएस टर्मिनलमध्ये झोपण्याचीही मुभा दिली. त्यामुळे कर्फ्यूतही माणूसकीचे दर्शन घडले.      

 पोलिसांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप 
भोसरी-आळंदी रस्ता चौकात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना बीआरटीएस टर्मिनलचे वाहतूक नियंत्रक काळूराम लांडगे, सुरेश कवडे, विजय आसादे, भाऊसाहेब हिंगडे आदींनी पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचे वाटप केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com