

घर नावे कर म्हणून
मुलाची आईला मारहाण
सोलापूर, ता. ११ : घर पत्नीच्या नावे कर, म्हणून मुलाने लाकडाने मारहाण केली. शनिवारी (ता. ९) रात्री दहाच्या सुमारास नेहरू नगरात ही घटना घडली. याप्रकरणी मुलासह सुनेविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रतीक महादेव चव्हाण, अश्विनी प्रतीक चव्हाण (रा. नेहरूनगर) अशी त्यांची नावे आहे. यातील फिर्यादी भारुबाई महादेव चव्हाण (रा. नेहरूनगर) या घरी असताना दारू पिऊन प्रतीक हा तेथे आला. त्याने सकाळी झालेल्या भांडणाबाबत पोलिसांत का तक्रार केली म्हणून शिवीगाळ केली. हे घर माझ्या बायकोच्या नावे न केल्यास जीवे सोडणार नाही, अशी धमकी त्याने आईला दिली. लाकडाने त्यांच्या डोक्यावर व उजव्या हाताच्या मनगटावर मारले. त्यात त्या जखमी झाल्या. त्यानंतर मुलगी सोडवायला आल्यावर त्याने तिच्या डोक्यावर व गालावर चापट मारली. त्याची पत्नी अश्विनी हिने त्यांच्यासह मुलीला शिवीगाळ करत जिवंत सोडणार नाही, काटा काढेन, अशी धमकी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.