मनोरूग्णालयातील ‘फॅमिली वॉर्ड’ होणार सुरु

yerwada
yerwada

येरवडा - येरवडा प्रादेशिक मनोरूग्णालयातील कौटुंबिक कक्ष अर्थात ‘फॅमिली वॉर्ड’ लवरकच सुरु होणार आहे. त्यामुळे रुग्णांना लवकर बरे होण्यासाठी औषधांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांच्या जिव्हाळ्याची, मायेची उब मिळणार आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुद्धा वाढणार असल्याची माहिती अधिक्षक डॉ. अभिजित फडणीस यांनी दिली. 

मनोरुग्णांना गोळ्या औषधांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांच्या सहवासाची गरज असते. त्यामुळे रुग्ण लवकर बरे होऊन सामाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा जाऊ शकतात. पूर्वी प्रमाणे दैनंदिन जीवन जगू शकतात. त्यासाठी ‘फॅमिली वॉर्ड’ ही संकल्पना आहे. त्यासाठी रुग्णालयात अशा कक्षांची उभारणी करून तेथे रुग्ण आणि त्याचे नातेवाईक राहू शकतील, अशी व्यवस्था करणे. तेथे घराप्रमाणे सोईसुविधांसह सुद्धा देणे. नातेवाईक स्वत: स्वयंपाक करून रुग्णांना खाऊ घालतील. त्यामुळे नियमित उपचाराबरोबरच नातेवाईकांच्या सहवासामुळे रुग्ण लवकर बरे होऊ शकतात. असे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे. ही संकल्पना इतर राज्यात व विदेशात असल्याचे त्यांचे मत आहे. मात्र आपल्याकडे मानसिक आजारी असलेल्या रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच चुकीचा आहे. रुग्ण कधीच बरा होणार नाही, अशी धारणा असल्यामुळे मनोरूग्णालयात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

सध्या मनोरुग्णालयात पुरूष रुग्णांसाठी नऊ आणि महिला रुग्णांसाठी सात कक्ष आहेत. या कक्षात एकावेळी दीडशे ते दोनशे रुग्णांना ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्याबरोबरच त्यांच्यावर देखरेख ठेवणे अशक्य आहे. सतराशे रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा अपुरी आहे. त्यामुळे फॅमिली वॉर्ड केल्यास रुग्णांची देखभाल व देखरेख करण्यासाठी त्यांचे नातेवाईक उपलब्ध होतील. कक्षातील रुग्णांची संख्या सुद्धा त्यामुळे आपोआपच कमी होईल, असे या मनोविकार तज्ज्ञांचे मत आहे.

‘‘ फॅमिली वॉर्डचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. त्याला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. रुग्णालयाच्या आवारात अनेक जुन्या इमारती वापराविना पडून आहेत. या इमारतींची दुरूस्ती करुन किंवा नवीन इमारत बांधुन त्या ठिकाणी फॅमिली वॉर्ड सुरू करता येऊ शकतात. ’’
- डॉ. अभिजित फडणीस, अधीक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com