

ओतूर, ता. ८ : जुन्नर तालुक्यातील बनकरफाटा मजूर अड्ड्यावर शेतमजुरीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या पुरुष मजुरांना ९०० ते १००० तर महिलांना ८५० ते ९५० रुपये रोजंदारी मिळत आहे. यामुळे मजुरांची दिवाळी जोरात साजरी होत आहे. मात्र ‘मजूर जोरात आणि शेतकरी कोमात’ असे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.
वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाला मिळणारा अत्यल्प बाजारभाव यामुळे शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडला आहे.
परिसरात सध्या कांदा लागवड, निंदणी, रोपे उपटणे आणि आगात कांद्याची खुरपणी या कामांना वेग आला आहे. यासोबतच फुलशेती, बीट काढणी आणि भाजीपाला तोडणीसाठी मजुरांची मोठी मागणी आहे. कोबी, फ्लॉवर, काकडी, पावटा आणि वाल काढणीची कामेही एकाच वेळी सुरू असल्याने मजुरांच्या हाताला शाश्वत रोजगार मिळाला आहे.
शेतीमध्ये यांत्रिकीकरण आले असले, तरी कांदा लागवड आणि भाजीपाला काढणी यांसारख्या कामांसाठी मजुरांवरच अवलंबून राहावे लागते. मजुरीसोबतच खते, औषधे आणि बियाण्यांच्या किमती वाढल्या आहेत. दुसरीकडे, बाजारभाव पडल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.
दरम्यान, बनकरफाटा परिसरातील सध्याचे चित्र पाहता, शेतमजुरांच्या हाताला काम आणि चांगली रोजंदारी मिळाल्याने त्यांची दिवाळी गोड झाली आहे; मात्र त्याच मजुरांच्या रोजंदारीचा खर्च भागवताना शेतकऱ्यांची दिवाळी मात्र आर्थिक संकटाच्या सावटाखाली साजरी होत आहे.
02710
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.