Mayur Ghogare
sakal
जुन्नर - जुन्नर तालुक्यातील अलदरे येथील शेतमजुराच्या मुलाने पोलिस भरतीमध्ये यश मिळवत शेतमजूर असलेल्या आईवडिलांच्या स्वप्नाला गवसणी घातली आहे. येथील ठाकर समाजाच्या मयूर घोगरे याची महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाली. पुणे शहर पोलिस भरतीमध्ये मयूर याने यश संपादित केले.