

घोडेगाव, ता. ८ ः शेती आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी पक्के रस्ते आवश्यक आहेत. मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेअंतर्गत आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील ज्या शेतकऱ्यांना शेतरस्ते हवे आहेत, त्यांनी तहसील कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या सनियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मागणी अर्ज सादर करावेत. पुढील बैठकीत या अर्जावर कार्यवाही करण्यात येईल, असे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील पंचायत समिती सभागृहात बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दिलीप वळसे पाटील होते.
प्रांताधिकारी अर्चना तांबे, शिरूरचे प्रांताधिकारी सुनील जोशी, तहसीलदार राहुल सारंग, समिती सदस्य प्रकाश घोलप, दत्तात्रेय कदम, दीपक बांगर, अरुण चौधरी, पंचायत समिती सभापती कैलासबुवा काळे, उपसभापती ज्योती पारधी, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज आदी उपस्थित होते.
आंबेगाव शिरूर मतदारसंघातील ७१ रस्त्यांची मोजणी पूर्ण झाली असून, त्यापैकी २२ रस्त्यांची कामे सुरू करता येणे शक्य असल्याची माहिती प्रांताधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.
या २२ रस्त्यांची कामे सुरू करण्यासाठी कंत्राटदार निश्चित करून कामांना तातडीने सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले. उर्वरित रस्त्यांची कामेही लवकर सुरू करावीत, अशा सूचना वळसे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.