
पुणे : पुणे बाजार समितीच्या फळविभागात शेतकऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. माझ्याकडील गाळ्यावर लिंबांचे डाग का उतरवले नाहीत, म्हणत मारहाण केली असल्याची तक्रार शेतकऱ्याने बाजार समितीकडे केली आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी मार्केट यार्डात शेतमाल विक्रीसाठी आणायचा का नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे.