खाजगी फायनान्सची मुजोरी; थकबाकीच्या नावाखाली शेतकऱ्याच्या घराला ठोकले कुलूप

खाजगी फायनान्सची मुजोरी; थकबाकीच्या नावाखाली शेतकऱ्याच्या घराला ठोकले कुलूप
Published on: 

UPR26B08911
गादेगाव : कर्जाच्या वसुलीसाठी पीडित शेतकरी बालाजी बागल यांच्या घराला फायनान्स कंपनीने ठोकलेले टाळे व घराबाहेर थांबलेले कुटुंबीय.

कर्जाची परतफेड करूनही शेतकऱ्याच्या घराला ठोकले कुलूप!
२० लाखांचे कर्ज; १६ ते १७ लाख भरूनही आणखी १० ते १२ लाखांची मागणी

पंढरपूर, ता. ३० ः खासगी फायनान्स कंपनीच्या वसुलीचा प्रकार पुन्हा चर्चेत आला आहे. पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील शेतकरी बालाजी बागल यांना राहत्या घरातून बाहेर काढून घराला कुलूप ठोकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे बागल यांचे कुटुंब बेघर झाले असून, फायनान्स कंपनीच्या वसुली पद्धतीवर संताप व्यक्त होत आहे.

बागल यांनी एका खासगी फायनान्स कंपनीकडून २० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी आतापर्यंत १६ ते १७ लाख रुपयांची परतफेड केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, कंपनीकडून आणखी १० ते १२ लाख रुपये भरण्यासाठी तगादा लावला जात असल्याचा आरोप आहे. वसुलीसाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थेट त्यांच्या राहत्या घराला कुलूप ठोकल्याने कुटुंबावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर भाजप किसान मोर्चाचे माजी सरचिटणीस माऊली हळणवर यांनी संबंधित फायनान्स कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कर्जवसुलीच्या नावाखाली नियम धाब्यावर बसवून घराला कुलूप ठोकण्याचा प्रकार गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पीडित शेतकरी बालाजी बागल यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे निवेदनाद्वारे न्याय देण्याची मागणी केली आहे. एकीकडे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे खासगी फायनान्स कंपन्यांच्या वसुलीचा जाच सहन करावा लागत असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.