Lockdown :शेतकऱ्यांवर मोठे संकट; झेंडू फुलला पण...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

लाॅकडाउनमुळे मागणीत घट

सांगवी : कांबळेश्वर (ता. बारामती) येथील शेतकरी दत्तात्रेय विठ्ठल दानवले यांनी एक लाख रुपये खर्च करून लागवड केलेले झेंडूच्या फुलांचे पीक कोरोनामुळे बाजारभाव नसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे सर्वत्रच धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. तसेच फुलबाजार बंद असल्यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. 

आणखी वाचा- अक्षय तृतीयेला त्यांनी जे केलं ते पडू शकतं महागात 

दानवले यांच्या शेतात दीड एकर झेंडूची फुले बहरात आली होती. मात्र, कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनचा मोठा फटका फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. येथील शेतकरी दानवले यांनी आपल्या शेतातील झेंडू उपटून टाकण्यास सुरूवात केली आहे. 

इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

फूल उत्पादक परिसरातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. म्हणजे थोडासा हातभार लागेल, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer face to problem of decrease demand of flower