पायी गावी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना शेतकऱ्याने दिले २ टन टरबूज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मे 2020

नारायणगाव येथील वाजगे यांचा उपक्रम 

नारायणगाव (पुणे) : चाकण, शिक्रापूर, तळेगाव औद्योगिक वसाहतीतील शेकडो मजूर दररोज येथील पुणे-नाशिक महामार्गावरून कुटुंबासह नाशिकच्या दिशेने पायी जात आहेत. त्यांना आठ दिवसांपासून टरबुजाच्या फोडींचे मोफत वाटप करून त्यांची तहान व भूक क्षमविण्याचे मौलिक काम येथील शेतकरी अंबादास दत्तात्रेय वाजगे करत आहेत. सामाजिक जाणिवेतून त्यांनी सुमारे दोन टन टरबुजाचे वाटप केले आहे. 

आणखी वाचा- पुण्याच्या सुपर आजीबाईंना, कोरोनाला हरवले

पुणे-नाशिक महामार्गावर मीना शाखा कालव्या लगत वाजगे यांची शेती आहे. वाजगे यांनी अडीच एकर क्षेत्रात टरबुजाची लागवड केली होती. मुंबई बाजारपेठ बंद असल्याने वाजगे यांनी महामार्गालगत टरबूजाचा स्टॉल लावला आहे.

आणखी वाचा- पुणेकरांनो `या` भागात पाच दिवस असणार कडक संचारबंदी 

रखरखत्या उन्हात बसणाऱ्या चटक्‍याची तमा न बाळगता काही अनवाणी मजूर आपल्या गावी जात आहेत. त्यांची हालअपेष्टा पाहून वाजगे यांचे मन हेलावले. त्यांच्यासाठी टरबुजांच्या फोडी वाटपाचा उपक्रम वाजगे राबवत आहेत. टरबूज कापून देण्यासाठी त्यांची तीन नातवंडे यांना मदत करतात. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

 

कोरोनामुळे समाजात फार मोठी आर्थिक दरी निर्माण झाली आहे. मानवतेच्या भावनेतून मी टरबुजाचे वाटप करत आहे.माझ्या आर्थिक नुकसानीपेक्षा टरबूज खात असताना मजुरांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान लाख मोलाचे आहे. 
- अंबादास वाजगे, टरबूज उत्पादक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The farmer gave of watermelon to the laborers in narayangaon