मृत रवींद्र काळभोर हे शेतकरी आहेत. सोमवारी (ता. ३१) नेहमीप्रमाणे दैनंदिन कामकाज उरकून ते रात्री दहाच्या सुमारास बाहेर पलंगावर झोपले.
उरुळी कांचन : घराच्या बाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना मंगळवारी (ता. १) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटना ही लोणी काळभोर परिसरातील (Loni Kalbhor) रायवाडी रोड, टाक्याचा माळ, सिद्धनाथ मंदिराजवळ (Siddhanath Temple) असणाऱ्या वडाळी वस्ती येथे घडली.