

जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांना १२८ कोटींची कर्जमुक्ती
कर्जखात्यांमध्ये रक्कम जमा; जिल्हा बँकेचे २ हजार ५२९ शेतकरी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ७ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील ११ हजार ३९४ शेतकऱ्यांना १२८ कोटी १० लाख ४४ हजार १६१ रुपयांची कर्जमुक्ती झाली आहे. राज्य शासनाने ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक कर्ज खात्यावर जमा केली आहे.
योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटी रुपयांची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट ऑनलाइन हस्तांतरित करण्यात आली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमुक्ती योजनेच्या ऑनलाइन लाभ वितरणास प्रारंभ झाला. आज पहिल्या टप्प्यात लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा बँकेच्या २ हजार ५२९ शेतकऱ्यांना २५ कोटी ३२ लाख ८० हजार ६२९ रुपयांचा लाभ झाला आहे.
आकडे बोलतात...
- पहिल्या यादीतील पात्र शेतकरी : २६ हजार २५३
- ई-केवायसी पूर्ण : १९ हजार ८००
- ई-केवायसी बाकी : ६ हजार ५००
कोट
लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी (आधार प्रमाणीकरण) करणे अनिवार्य आहे. पात्र लाभार्थ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून त्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम शासनाकडून जमा झाल्यानंतर ते नव्याने पीक कर्ज घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत.
- एस. कार्तिकेयन, जिल्हाधिकारी
पोर्टलवर करा तक्रार
कर्जमाफी योजनेच्या पोर्टलवरील रक्कम किंवा पोर्टलवरील शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत इतर कोणताही तपशील शेतकऱ्यास अमान्य असल्यास लाभार्थ्याने पोर्टलवर तक्रारीची (Grievance) नोंद करावी. या तक्रारीचे निराकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत केले जाणार आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांचे निधन झाले आहे, अशा लाभार्थ्याच्या वारसाने बँकेकडे मयत कर्जदाराच्या कर्ज खात्यात वारस नोंद व ॲग्रीस्टॅक काढून बँकेस कळविल्यानंतर कर्जमाफीची कार्यवाही होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.