
पुणे : शेतकरी आंदोलन, चळवळ यापेक्षा राजकीय पक्षाचा झेंडा महत्त्वाचा वाटू लागला आहे, हे चिंताजनक आहे. विदेशांतून येणाऱ्या मका, सोयाबीन, दुग्धजन्य पदार्थांच्या आपल्या देशात वितरणाला सरसकट परवानगी देता कामा नये. त्यासाठी एकत्रित आणि ठाम विरोधाची भूमिका घेत, किमान समान मुद्द्यांवर सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येण्याचा निर्णय शुक्रवारी पुण्यात झालेल्या शेतकरी हक्क परिषदेत घेण्यात आला.