

शेतकरी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी सुसंवादात झाले कृषिज्ञान मंथन
कृषी विभाग व विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम
ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ व राज्य कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तांभेरे (ता. राहुरी) येथे शेतकरी- शास्त्रज्ञ -विद्यार्थी सुसंवाद कार्यक्रमातून कृषी ज्ञानाचे मंथन झाले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, सरपंच डॉ. उमेश मुसमाडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, शिक्षण संचालक डॉ.साताप्पा खरबडे, डॉ. अण्णासाहेब शिंदे शासकीय कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक व प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, ताराचंद गागरे, मृदाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भीमराव कांबळे, कृषी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र हिले, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भारत पाटील, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उत्तम कदम, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेश दोडके, वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय कोळसे,जीव रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश लोखंडे, शास्त्रज्ञ डॉ. तुळशीदास बाष्टेवाड, प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन सदाफळ उपस्थित होते.
यावेळी डॉ. विक्रम कड, डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. आनंद जाधव, डॉ. विजयकुमार शिंदे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले. ताराचंद गागरे, लक्ष्मण गागरे व प्रा. मच्छिंद्र निमसे यांनी मनोगत व्यक्त केले. चिंचविहिरे येथील प्रगतशील शेतकरी महिला निर्मलाताई गाडे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. पंडित खर्डे यांनी मानले.
--- फोटो B10204 ---
तांभेरे (ता. राहुरी) : येथे कृषी विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून आयोजित कार्यक्रमात सहभागी शेतकरी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी.