Medical Negligence : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; नातेवाइकांचा आरोप, पौड ग्रामीण रुग्णालयात चुकीचे उपचार
Healthcare : नांदगावच्या शेतकरी शंकर तुकाराम पेरणेकर यांचा पौड ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नातेवाइकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
कोळवण : नांदगाव येथील शंकर तुकाराम पेरणेकर या शेतकऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. त्यामुळे पौड ग्रामीण रुग्णालयाबाबत आक्रोश व्यक्त केला जात आहे.