शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी राज्यभर बळीराजा हुंकार यात्रा; राजू शेट्टी

एकरकमी एफआरपी,शेतीपंपाना दिवसा १० तास वीज,भूमीअधिग्रहन कायद्यातील बदल व शेतीमालाला हमी भावची देण्याची शेतकरी संघटनेची मागणी...
Farmer suicide Baliraja Hunkar Yatra for farmers Raju Shetty Swabhimani Shetkari Sanghatana pune
Farmer suicide Baliraja Hunkar Yatra for farmers Raju Shetty Swabhimani Shetkari Sanghatana pune sakal

वालचंदनगर : राज्यातील शेतकरी अडचणीमध्ये असून सत्ताधारी व विरोधकांना शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्‍नावरती चर्चा करण्यास वेळ नाही. शेतकरी आत्महत्या करीत असून शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. तरुण शेतकऱ्यांच्या मनामध्ये राग असून असंतोष निर्माण झाला. उसाची एकरकमी एफआरपी,शेतीपंपाला दिवसा १० तास वीजपुरवठा, भूमीअधिग्रहन कायद्यामध्ये बदल व शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला हमी भावासाठी बळीराजा हुंकार यात्रा सुरु करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी लढा देणार असल्याचे माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सांगितले.

भवानीनगर (ता.इंदापूर) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या बळीराजा हुंकार यात्रेच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, शेतकरी कृती समितीचे पुणे जिल्हाचे अध्यक्ष सतिश काकडे, शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र ढवाण, युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अमरसिंह कदम, राजेंद्र काळे, पांडुरंग कचरे, शिवाजी निंबाळकर, सतिश काटे, विशाल निंबाळकर , अॅड. प्रदीप थोरात उपस्थित होते. यावेळी शेट्टी यांनी सांगितले की, ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. पेट्रोल डिझेलचे भाव गगणाला भिडले आहेत. दोन वर्ष काेरोना व लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला. यवतमाळमध्ये मुलाने आत्महत्या केली. तर पंढरपूरमध्ये युवक शेतकऱ्याने वीज तोडल्यामुळे त्याला आत्महत्या करावी लागली. राज्यातील शेतकऱ्याच्या मनामध्ये राग आहे. शेतकरी अस्वस्थ झाला आहे.

महाराष्ट्राच्या मुलभूत प्रश्‍नावरती चर्चा करण्यास सत्ताधारी व विरोधकांनाही वेळ नाही. जे महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षात आहेत त्यांनाही वेळ नाही. व जे दिल्ली मध्ये विरोधी पक्षात आहेत त्यांनाही वेळ नाही.राज्यामध्ये सर्व माध्यमामध्ये ईडीची चौकशी, पोलिस चौकशी अटक अशा बातम्या असून एकमेकावर चिखलफेक सुरु आहे. महाराष्ट्रामध्ये काय चालले आहे हे कळत नाही. शेतकऱ्यांचे मुख्य प्रश्‍न मागे पडले असून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी राज्यभर बळीराजा हुंकार यात्रा सुरु केली आहे. शेतकऱ्यांच्या एफआरपीचे तुकडे केल्यास शेतकऱ्यांना पीककर्जाची परतफेड वेळेमध्ये करता येणार नसून शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाचा फायदा मिळणार नाही. उलट १२ टक्के व्याजाचा भुर्दंड सोसावा लागले. तसेच राज्यातील सर्वांना पुरेशी वीज उपलब्ध होणार आहे. मात्र शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतीसाठी वीज कमी दाबाने देण्यात येत असून यामुळे अनेक शेतकऱ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज उपलब्ध करुन द्यावी. शेतकऱ्यांच्या जमीनी शासनाने घेतल्यास त्यांना रेडीरेकनर दराच्या चार ते पाच पट अधिक मोबदला मिळत होता.

मात्र भूमीअधिग्रहन कायद्यामध्ये बदल केल्यामुळे रेडीरेकनच्या दराच्या दुप्पट रक्कम मिळणार असून यामध्ये २० टक्के कपात करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी सर्व उत्पादित केलेल्या मालाची किमान आधारभूत किंमत ठरवून हमी भाव देण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले की, १४ हजार सभासद छत्रपती कारखान्याला उस घालत नाहीत. संस्थेच्या हितासाठी न्यायालयामध्ये गेलो आहे. छत्रपतीची निवडणूक जिंकण्यासाठी नियमामध्ये बदल केला जात आहे. संस्थेच्या हितासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com