आत्महत्या टाळायच्या असतील तर चंदन लागवडीला परवानगी द्या : अनिल खोत

रासायनिक खते, बुरशी व तणनाशके, जैविक खते परवडत नाहीत, उत्पादित मालास हमीभाव मिळत नसल्याने शेती परवडत नाही.
चंदन लागवड
चंदन लागवडSakal

इंदापूर : देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे मात्र अस्मानी व सुलतानी संकटांनी शेती व्यवसाय धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळून त्यांना सुखी करण्यासाठी शासनाने शेतीपूरक व्यवसाय म्हणून चंदन लागवड करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संघटक अनिल खोत यांनी केली.

पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील सुरज जाधव या युवा शेतकऱ्याने शासन शेतकरी विरोधी धोरणास कंटाळून आत्महत्या केली. हा प्रकार दुर्दैवी आहे. शासनाने त्याच्या कुटुंबास भरीव मदत करावी तसेच भविष्यात होणाऱ्या आत्महत्या टाळण्यासाठी चंदन लागवडीचे धोरण स्वीकारावे असे त्यांचे म्हणणे आहे.

चंदन लागवड
पुणे : 'कोम्बिंग ऑपरेशन'मध्ये सराईत गुन्हेगारांची झाडाझडती

यासंदर्भात खोत पुढे म्हणाले,शासनानेजाचक अटी घालून सामाजिक वनीकरण माध्यमातून चंदन लागवडी साठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, त्यांना रोपे व अनुदान द्यावे, शेतीला जोड धंदा म्हणून प्रोत्साहन द्यावे, पिकाला हमीभाव देणे गरजेचे आहे. इतर पिकांना किटकनाशके, रासायनिक खते, बुरशी व तणनाशके, जैविक खते परवडत नाहीत, उत्पादित मालास हमीभाव मिळत नसल्याने शेती परवडत नाही. त्यामुळे कमी खर्चामध्ये चंदन लागवड हा चांगला पर्याय शेतकऱ्यां साठी आहे. शासनाने चंदन लागवडीच्या जाचक अटी व शर्ती रद्द करून भूमिहीन, अल्पभूधारक, कोरडवाहू जमीन व दुष्काळी भागात नापीक जमिनीवर कमी पावसामध्ये चंदन लागवड करणे शक्य आहे.

सध्या शासनाने शेतकऱ्यांच्या शेती मालापासूनवाईन बनवण्याचा धोरणात्मक निर्णय घेवून दारू अथवा वाईन सुपरमार्केट, मॉल, किराणा दुकानामध्ये उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकरी समृद्ध होण्याऐवजी युवा शेतकरी व्यसनाधीन होवून मृत्यूला लवकर जवळ करेल. त्यामुळे आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक प्रश्न निर्माण होतील .त्यामुळे शासनास खरोखर शेतकऱ्यांचे भले करायचे असेल,त्याला आत्महत्येपासूनपरावृत्त करायचे असेल तर त्याला चंदन लागवडीची परवानगी देणे ही काळाची गरज असल्याचे अनिल खोत यांनी शेवटी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com