मंचरमध्ये १९०० शेतकऱ्यांची विमा नोंदणी

मंचरमध्ये १९०० शेतकऱ्यांची विमा नोंदणी
Published on: 

मंचर, ता. १३ : ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन लाख रुपयांपर्यंतची अपघात विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एक हजार ९०० शेतकऱ्यांनी अपघात विमा नोंदणी केली आहे,’’ अशी माहिती आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली.
बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात तसेच लोणी, चांडोली खुर्द उपबाजार आवारात शेतमाल घेऊन येणारे आणि योजनेसाठी नोंदणी केलेले शेतकरी या विमा संरक्षणासाठी पात्र ठरणार आहेत. या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व आल्यास विम्याच्या रकमेच्या १०० टक्के म्हणजेच दोन लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे, तसेच एक हात किंवा पाय गमावणे अथवा दृष्टी गमावणे यांसारख्या कायमस्वरूपी अंशतः अपंगत्वाच्या प्रसंगी विमा रकमेच्या ५० टक्के म्हणजेच एक लाख रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे वय १८ ते ७० वर्षे असणे आवश्यक आहे.
विमा नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी ‘ॲग्रीक्स’ हे मोबाईल ॲप डाउनलोड करावे. बाजार समितीकडे नोंद असलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे ॲपमध्ये प्रवेश करून स्वतःची ओळख पडताळणी करावी. त्यानंतर विमा अर्ज भरता येणार आहे. ओळख पडताळणीसाठी आधार क्रमांक आणि त्याला जोडलेला मोबाईल क्रमांक जवळ ठेवणे आवश्यक आहे. नोंदणी करताना काही अडचण आल्यास ॲपमधील मदत विभागाचा वापर करता येणार आहे. उपसभापती सचिन पानसरे व संचालक मंडळाने पात्र शेतकऱ्यांनी या योजनेची नोंदणी करून विमा संरक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत येताना शेतकऱ्यांना अपघाताचा धोका असतो. अशा वेळी दोन लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळणे हे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आर्थिक आधार ठरणार आहे. बाजार समितीचा हा उपक्रम निश्चितच स्वागतार्ह आहे.
- बाळासाहेब बाणखेले, अडते मंचर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com