esakal | जुन्नर : धोलवड येथील नदीपात्रात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

electric shock

जुन्नर : धोलवड येथील नदीपात्रात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
पराग जगताप

ओतूर : धोलवड (ता. जुन्नर) येथील जांभूळपट येथे नदीपात्रात विजेचा धक्का लागून पाण्यात बुडून शेतकरी व कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली असून, यातकौस्तुभ शरद गंभीर (वय. ३० रा. खामुंडी, ता. जुन्नर) व आंतीराम गंधास भालेरा (वय २५ सध्या रा. खामुंडी मुळ रा. पालासपाने पो. चाचेरीया ता. सेंधवा, जि. बडवाणी मध्यप्रदेश) हे दोघे मृत झाले.

हेही वाचा: Corona Update : पिंपरी-चिंचवडमध्ये ७५० नवीन रुग्ण

या बाबत ओतूरचे साहय्यक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे अधिक माहिती देताना म्हणाले की, जांभळपट येथील येथील शेतकरी गणेश शिंगोटे यांचा विद्युतपंप नदीपात्रातील पाण्यात ढकलण्यासाठी अरूण शिंगोटे व कौस्तुभ गंभीर तेथे आले होते. व गणेश शिंगोटे व त्यांचा मजुर आंतीराम भालेरा तेथेच होते. कौस्तुभ गंभीर व आंतीराम भालेरा हे दोघे विद्युतपंप पाण्यात ढकलण्यासाठी नदीपात्रात उतरले त्यांनी पाण्यात विद्युतपंप पुढे ढकलत नेला. त्यांचा बोलण्याचा आवाज डीपी जवळ उभ्या असलेल्या शिंगोटे यांना न आल्याने त्यांनी नदीपात्र पाहिले असता दोघेही दिसले नसल्याने त्यांनी स्थानिक वायरमन यांना संपर्क केला व त्यानंतर गावातील स्थानिक लोक जमा झाले. लोकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान नदीपात्रातील पाण्यात त्यांना विजेचा धक्का बसला असल्याची चर्चा परिसरात आहे. याबाबत ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते म्हणाले की शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

हेही वाचा: पुणे महापालिका, ZPची म्युकरमायकोसिस रुग्णांची शोधमोहिम