शेतकरी हे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे; पण...

डॉ. संदेश शहा
Saturday, 1 August 2020

शेतकरी हे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून कोरोना महामारी संचारबंदी तसेच अनलॉक मुळे हा व्यवसाय संकटात आहे. त्यामुळे या व्यवसायात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मंत्रिमंडळात चर्चा झाली असून यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय होणार आहे. आपण शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी माहीत आहेत.

इंदापूर - शेतकरी हे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून कोरोना महामारी संचारबंदी तसेच अनलॉक मुळे हा व्यवसाय संकटात आहे. त्यामुळे या व्यवसायात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मंत्रिमंडळात चर्चा झाली असून यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय होणार आहे. आपण शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी माहीत आहेत. मात्र या प्रश्नावरून आपणास धारेवर धरण्याचा प्रयत्न तालुक्यातील विरोधक करत आहेत. विरोधकांना टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही अशी उपरोधिक टीका दुग्ध विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात ते बोलत होते. यावेळी प्रताप पाटील, अनिल राऊत, लक्ष्मण देवकाते उपस्थित होते.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले, पंढरपूर आषाढी एकादशीस तुम्हा सर्वांच्या आशीर्वादा मुळे श्री पांडुरंगाची महापूजा करण्याचा मान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, त्यांच्या पत्नी तसेच पर्यावरण कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला मिळाला. या महापुजेची फोटो सहित प्रसिद्धी सर्वत्र होत असते. मात्र, आपण प्रसिद्धीसाठी प्रयत्न न करता केवळ पांडुरंगाचे आशीर्वाद घेतले. मात्र यापूर्वी मंत्री असलेल्या तालुक्यातील नेत्याने आपला चेहरा अनेक वर्षं पुढे केल्याचे फोटो अनेक जणांनी पाहिले आहेत. त्यामुळे प्रसिद्धीची हाव कोणाला आहे हे इंदापूर तालुक्यात सर्वांना माहिती आहे.

विरोधकांच्या निरा भीमा व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यात सर्वांना सभासद केले जात नाही, कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर दिले जात नाहीत. कर्मयोगी कारखान्याने शेतकऱ्यांना ऊसाची संपूर्ण एफआरपी दिली नाही. बंद पडलेला दुधगंगा कुणाच्या चुकीमुळे बंद पडला होता, त्यामुळे कुठल्या कर्मचाऱ्यास आत्महत्या करावी लागली, याच्या खोलात आम्हास जाण्यास भाग पाडू नका असा इशारा त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना दिला. कोरोना सुरू झाल्यापासून चार महिन्यात आपण तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांना जीवनावश्यक किट वाटप केले, जिल्ह्यात सर्वाधिक 10 हजार बाटल्या रक्त संकलन केले.

विरोधकांच्या बावडा गावात देखील 750 लोकांना किट वाटप केले. तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन आपण किरकोळ अपवाद वगळता स्वखर्चाने किट वाटप केले. मात्र विरोधकांनी आपल्या गावात देखील किट वाटले नाही, एक बाटली रक्तसंकलन केले नाही, त्यांना माझ्यावर टीका करण्याचा नैतीक अधिकार नाही. जे स्वतःला मेरीट मध्ये समजतात, त्यांचे दोनवेळा मेरीट का घसरले याची चिंता त्यांनी करावी. शेतकरी असल्यामुळे आपण दूध उत्पादक शेतकऱ्यांसमवेत आहे. त्यांच्या अडचणी मला माहित आहेत. त्यामुळे दुधासंदर्भात सकारात्मक निर्णय लवकरच होणार आहे. तालुक्याचे पाणी, शेती, दूध तसेच इतर प्रश्न सोडविण्यासाठी आपला जनसेवक लोकप्रतिनिधी म्हणून सक्षम असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers are the backbone of our economy dattatray bharne