
विश्रांतवाडी : पंढरपूर तालुक्यातील करकंब या गावातील मृद जलसंधारण विभागाच्या पाझर तलावाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत जनशक्ती शेतकरी संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी येरवडा येथील मुख्य अभियंता जलसंधारण कार्यालयाला वेढा घालत दंडवत आंदोलन केले. दंडवत घालत कार्यलयाच्या दारापर्यंत कार्यकर्ते आले. दंडवत आंदोलनानंतर मागण्या मान्य न झाल्याने गांधींगिरी करीत आंदोलन केले.