अटल अर्थ सहाय्य योजनेपासून वंचित शेतकरी जमले साखर संकुलमध्ये

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

अनेकांनी कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून प्राथमिक रक्कम उभारलीय, मात्र अद्याप ही व्यवसाय सुरु न करता आल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. कर्जाची रक्कम आणि अनुदान लवकरात लवकर मिळावे जेणेकरून उद्योग व्यवसाय सुरु करता येतील अशी मागणी शेतकरी आणि संस्थाचालकांनी यावेळी केली.

पुणे : शेती मालावर आधारित प्रक्रिया उद्योग तसेच शेतीपूरक व्यवसाय सुरु करण्यासाठी संस्था रजिस्टर केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप अनुदान, आणि अटल अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम मिळलेली नाही. त्यामुळे राज्यातील अनेक भागातील शेतकरी आज पुण्यातील साखर संकुल येथे आलेले आहेत.

अनेकांनी कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून प्राथमिक रक्कम उभारलीय, मात्र अद्याप ही व्यवसाय सुरु न करता आल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे. कर्जाची रक्कम आणि अनुदान लवकरात लवकर मिळावे जेणेकरून उद्योग व्यवसाय सुरु करता येतील अशी मागणी शेतकरी आणि संस्थाचालकांनी यावेळी केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers deprived of Atal financing scheme gathered in Sakhar Sankul In pune