Recurring Cable Thefts at Yedgaon Dam Reservoir
sakal
नारायणगाव : येडगाव धरण जलाशयातील खंडोबामाळ परिसरातील सहा शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या केबल आज्ञात चोरट्यांनी आज पहाटेच्या सुमारास चोरून नेल्या. 8 फेब्रुवारी 2026 पासून आज अखेर येडगाव धरण जलाशयातील खंडोबामाळ व इंदिरानगर परिसरातील केबल चोरीची ही चौथी घटना आहे. सातत्याने केबल चोरी होत असताना सरावलेल्या या केबल चोरट्यांचा शाळा लावण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. केबल चोरीचा छडा लागत नसल्याने चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.