कोल्हापूरः कसणाऱ्यांची जमीन’साठी लढा उभारणार

कोल्हापूरः कसणाऱ्यांची जमीन’साठी लढा उभारणार
Published on

‘देवस्थान जमीन’ कसणाऱ्यांच्या
नावावर सातबारा करण्यासाठी लढा

अखिल भारतीय किसान सभेच्या मेळाव्यात ठराव

ॲग्रोवन वृत्तसेवा
नूल, जि. कोल्हापूर : देवस्थानची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे सातबारा तयार करण्यासाठी गडहिंग्लज तालुक्यात लढा उभारण्याचा ठराव अखिल भारतीय किसान सभेच्या संघर्ष व लढा मेळाव्यात मंजूर करण्यात आला. जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाच्छापुरे अध्यक्षस्थानी होते. किसान सभेचे अधिवक्ता दशरथ दळवी यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्‍घाटन झाले. किसान सभेच्या राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा सहसचिव संग्राम सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
दळवी म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या जमीन, पाणी, पीक व कर्ज प्रश्नांपासून ते शेतीमालाला रास्त व हमीभाव मिळावा यासाठी किसान सभेने सातत्याने लढे उभारले आहेत. शेतकरी व कष्टकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कायदेशीर व संघटनात्मक संघर्ष एकत्रितपणे पुढे नेण्यासाठी एकजुटीने लढा उभारला जाईल.’’
संग्राम सावंत म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील देवस्थान, मठ, ट्रस्टच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांचे हक्क, इतर शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजूर, कामगार, भूमिहीन, बेघरांच्या समस्या, गावठाणवाढ आदी प्रश्नांबाबत लढा देणार आहे. कोल्हापुरात ६, ७ व ८ ऑक्टोबरला होणाऱ्या राज्य अधिवेशनाला उपस्थित राहावे.’’
पाच्छापुरे म्हणाले, ‘‘वाढता शेती उत्पादन खर्च, शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव, शेतकऱ्यांवरील वाढते कर्ज, हवामान बदल व नैसर्गिक आपत्ती, सिंचन व पाण्याचे प्रश्न, ग्रामीण बेरोजगारी आणि शेती क्षेत्रासमोरील विविध संकटांमुळे शेतकरी-कष्टकऱ्यांसमोर गंभीर आव्हाने आहेत.’’
संभाजी मोहिते यांनी संबंधित जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांवरील अन्यायाची मांडणी केली. शिवाजी गुरव यांनी स्थानिक लढ्यांना संघटित स्वरूप देण्याची गरज व्यक्त केली. सविता पाटील, भगवान सूर्यवंशी, बसवंत कोरी, सुनील फुटाणे, छाया माने, भारती पाटील, शिवाजी कुराडे, भीमराव अस्वले, तानाजी यादव, संतोष चव्हाण, सुभाष शिंदे, रामचंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com