खूशखबर! खूशखबर!! कांदे घ्या...; विक्रीसाठी मोबाईल ट्यून

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 November 2020

व्यापारी समाधानकारक भाव देत नसल्यामुळे येथील सतीश योगिराज मोटे हे स्वत:च मार्केटिंग करून कांदा विक्री करत आहेत. या ट्यूनमुळे सर्वजण आकर्षित होत आहेत. यामुळे ग्राहकांना फायदा होत आहे.

वालचंदनगर - खूशखबर! खूशखबर!! कांदे घ्या... कांदे. ६० रुपयांना एक किलो, तर १०० रुपयांना २ किलो... अशी मोबाईलवर ट्यून तयार करून कांदा विक्रीसाठी ती स्पिकरवर लावण्याची आयडियाची कल्पना लढवली आहे गोतोंडी (ता. इंदापूर) येथील एका शेतकऱ्याने. व्यापारी समाधानकारक भाव देत नसल्यामुळे येथील सतीश योगिराज मोटे हे स्वत:च मार्केटिंग करून कांदा विक्री करत आहेत. या ट्यूनमुळे सर्वजण आकर्षित होत आहेत. यामुळे ग्राहकांना फायदा होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या कांद्याला प्रतवारीनुसार ३० ते ७५ रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये कांदा घेऊन गेल्यानंतर व्यापारी प्रतवारी करून कमीत -कमी दर देण्याचा प्रयत्न करतात. मोटे यांनी २ एकर क्षेत्रामध्ये कांद्याचे २५ टन उत्पादन घेतले. सुमारे १२ टन कांदा सोलापूर, सांगलीच्या व इंदापूरच्या मार्केटमध्ये ६० ते ७० रुपये किलो दराने विकला. यासाठी त्यांना भाडोत्री टेम्पो करून कांदा घेऊन जावा लागला होता. नंतरच्या काळामध्ये दरही कमी जास्त होऊ लागल्याने त्यांनी घरच्या ट्रॅक्‍टर व ट्रॉलीमधून  थेट ग्राहकानांच कांदा विकण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी घरीच मोबाईलवर ट्यून बनविली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्वत:च्या ट्रॅक्‍टर-ट्रॉलीमध्ये कांदा भरून इंदापूरच्या पश्‍चिम भागातील लासुर्णे, अंथुर्णे, शेळगाव, जंक्‍शन व वालचंदनगर परिसरात विक्रीस सुरुवात केली आहे. 

कांद्याची प्रतवारी केल्यानंतर कांद्याला ३० ते ७० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. मी सरसकट १०० रुपयांना दोन किलो कांदा विकल्यामुळे माझा व ग्राहकांचा फायदा होत आहे.
- सतीश मोटे, कांदा उत्पादक

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

१० टन कांद्याची विक्री
आत्तापर्यंत त्यांनी सुमारे १० टन कांद्याची विक्री केली असून शिल्लक राहिलेला तीन टन  कांदा थेट ग्राहकांना विकणार आहेत. मोटे यांच्या थेट कांदा विक्रीमुळे ग्राहकांचा फायदा होत असून ८० ते ९० रुपये किलो दराचा कांदा नागरिकांना ५० रुपये किलोमध्ये मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Idea Mobile tune for selling onions