फार्मर आयडी शेतकरी गायब

फार्मर आयडी शेतकरी गायब
Published on

वनहक्क पट्टेधारक शेतकरी
‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

कोरपना तालुक्यातील अनेक शेतकरी अडचणीत

ॲग्रोवन वृत्तसेवा
गडचांदूर, जि. चंद्रपूर : वनहक्क पट्टा असूनही जमिनीची नोंद ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नसल्याने कोरपना तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची फार्मर आयडी प्रक्रिया रखडली आहे. त्याचा फटका कर्जमाफीसाठी आवश्यक केवायसीला बसत आहे.
शासनाने वनहक्क पट्टे देऊन जमिनीवरील हक्क मान्य केलेल्या शेतकऱ्यांपैकी अनेक जण वर्षानुवर्षे त्या जमिनीवर शेती करीत आहेत. मात्र, फार्मर आयडी तयार करताना संबंधित जमिनीची माहिती ॲग्रीस्टॅक पोर्टलवर उपलब्ध होत नसल्याची तक्रार आहे.
परसोड, चोपण, शिवापूर, चनई खुर्द, मागली, सांगापूर, थिप्पा, बोरगाव, इंजापूर, बेलगाव आणि रामपूर या गावांतील वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अधिकृत वनहक्क पट्टा आणि अन्य आवश्यक कागदपत्रे असूनही पोर्टलवर नोंद उपलब्ध नसल्याने फार्मर आयडी तयार होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे, काही शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आधीपासून असतानाही कर्जमाफीच्या केवायसी पोर्टलवर त्यांचा आयडी दिसत नसल्याचा गोंधळ समोर आला आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण होत नाही.
वनहक्क पट्टा, आधारकार्ड आणि इतर कागदपत्रे घेऊन शेतकरी सेतू केंद्रे, बँका तसेच संबंधित शासकीय कार्यालयांच्या चकरा मारत आहेत. मात्र, पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे ठोस तोडगा निघत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांची माहिती तातडीने ॲग्रीस्टॅक पोर्टलवर अद्ययावत करावी. तोपर्यंत ऑफलाइन पडताळणी करून कर्जमाफीची केवायसी पूर्ण करण्याची विशेष व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. डिजिटल व्यवस्थेतील त्रुटीमुळे एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोट ----
माझी फार्मर आयडी आहे. मात्र, कर्जमाफीच्या केवायसी पोर्टलवर ती दिसत नसल्याने केवायसी पूर्ण होत नाही.
- गजानन लालसरे, शेतकरी, खिर्डी

माझ्याकडे वनहक्क पट्टा असून अनेक वर्षांपासून शेती करीत आहे. मात्र, पोर्टलवर नाव नसल्याने फार्मर आयडी तयार होत नाही आणि कर्जमाफीची केवायसी रखडली आहे.
- रामदास मेश्राम, वनहक्क पट्टेधारक शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com