बुलडाणा : नवीन पीक कर्ज

बुलडाणा : नवीन पीक कर्ज
Published on: 

पान ६ अकोला + फोटो B27754
--------------
पतसंस्था, ‘फायनान्स’च्या
कर्जामुळे पीककर्ज अडविले

शेतकरी त्रस्त; आंदोलनाचा इशारा

ॲग्रोवन वृत्तसेवा
बुलडाणा : नवीन पीककर्ज मिळविताना सातबारावर पतसंस्था किंवा मायक्रो फायनान्स संस्थांचे कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारले जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

या पार्श्वभूमीवर आंदोलक अक्षय पाटील यांनी नुकतीच (ता.२) शेतकऱ्यांसह भारतीय स्टेट बँकेच्या जळगाव जामोद शाखेत जाऊन शाखा व्यवस्थापकांची भेट घेतली.

या वेळी बँक प्रशासनाशी चर्चा करून शेतकऱ्यांना अनावश्यक अटी न लावता नियमानुसार तातडीने पीककर्ज वाटप करावे. सातबारावर पतसंस्था किंवा मायक्रो फायनान्स संस्थांकडून घेतलेले कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या पीककर्ज अर्जांबाबतही टाळाटाळ करू नये, अशी मागणी अक्षय पाटील यांनी येथे केली.

श्री. पाटील म्हणाले, ‘‘पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स संस्थांकडील कर्जाचा पीककर्जाशी थेट संबंध नसताना त्याचा आधार घेऊन शेतकऱ्यांना नवीन पीककर्जापासून वंचित ठेवले जात आहे.’’ पीककर्ज वितरणातील अडवणूक थांबविली नाही, तर बँक प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पाटील यांनी दिला.

--- फोटो --- B27754 ---
बुलडाणा : शेतकऱ्यांच्या पीककर्ज विषयी स्टेट बँकेच्या जळगाव जामोद शाखेत अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना आंदोलक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.