

नियमित कर्जफेडीचे अनुदान
एक लाख करा : राजेश पाटील
----
चंदगड, जि. कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत नियमितपणे आणि प्रामाणिकपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणारे प्रोत्साहनपर अनुदान सध्या असलेल्या ५० हजारांवरून किमान एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक करावे, अशी मागणी माजी आमदार राजेश पाटील यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली. मुंबई येथे भेट घेऊन त्यांनी या संदर्भात चर्चा केली.
पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील शेतकरी नियमितपणे कर्जफेड करणारे असून या भागात थकीत कर्जाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे आर्थिक शिस्त पाळणाऱ्या आणि वेळेत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रामाणिकपणाचा सन्मान म्हणून प्रोत्साहनपर अनुदानात भरीव वाढ करणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले.
या वेळी त्यांनी चंदगड तालुक्यात सध्या निर्माण झालेल्या खतांच्या तुटवड्याचाही प्रश्न कृषिमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. खरीप हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांना आवश्यक खतांचा वेळेत आणि पुरेसा पुरवठा होणे अत्यावश्यक असल्याने चंदगड तालुक्यातील खतटंचाई तातडीने दूर करून शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. या वेळी सभापती विलास नाईक, चंदगड तालुका संघाचे उपाध्यक्ष तानाजी गडकरी, एस. एल. पाटील, अनिल सुरुतकर, एस. वाय. पाटील, विनोद पाटील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.