बाजार समिती सचिवांना ५० लाखांचे अपघाती विमा संरक्षण

बाजार समिती सचिवांना ५० लाखांचे अपघाती विमा संरक्षण
Published on: 

बाजार समिती सचिवांना
५० लाखांचा अपघाती विमा

सचिव संघाचा निर्णय; १६२ सभासदांसाठी ८१ कोटींचे विमा कवच, स्वनिधीतून भरला १.९१ लाखांचा हप्ता

ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सचिवांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सुरक्षा मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव संघाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील १६२ अधिकृत सभासद सचिवांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण देण्यात आले आहे. आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत ही सामूहिक विमा योजना राबविण्यात आली असून, संपूर्ण समूहाला ८१ कोटी रुपयांचे विमा कवच उपलब्ध झाले आहे.
सचिव संघाचे अध्यक्ष विलासराव पुंडकर, उपाध्यक्ष पराग दाते, सरचिटणीस शंकरराव सोनवलकर आणि कार्यकारिणी संचालक मंडळाच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सचिवांच्या दैनंदिन कामकाजातील जोखीम लक्षात घेऊन त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
या विम्यासाठी प्रति सभासद वार्षिक १ हजार १८० रुपये हप्ता निश्चित करण्यात आला आहे. १६२ सभासदांचा एकूण १ लाख ९१ हजार ११५ रुपयांचा विमा हप्ता सचिव संघाने स्वतःच्या निधीतून भरला आहे. त्यामुळे सभासद सचिवांना वैयक्तिकरीत्या विमा हप्त्याचा आर्थिक भार सोसावा लागणार नाही.
या विमा योजनेत अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व, कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व आणि अपघाती रुग्णालयीन उपचारांचा समावेश आहे. तसेच प्राणी, साप किंवा कीटकांच्या दंशावरील उपचार आणि दुर्घटनेत मृतदेह वाहून नेण्यासाठी विशेष आर्थिक मदतीचेही संरक्षण देण्यात आले आहे.
शेतकरी आणि बाजार समित्यांच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सचिवांच्या सुरक्षिततेसाठी संघाने घेतलेल्या या निर्णयाचे राज्यातील सचिव वर्गातून स्वागत होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.