कास - अंधारी तील शेतकरी आक्रमक.... रस्त्याच्या कामाला विरोध...

कास - अंधारी तील शेतकरी आक्रमक.... रस्त्याच्या कामाला विरोध...

Published on

अंधारीकरांचा रस्त्याच्या कामास विरोध

ठेकेदाराकडून फळझाडांची विनापरवाना तोड; नुकसान भरपाईची मागणी

कास, ता. २४ : जावळी तालुक्यात सुरू असलेल्या पाचवड- मेढा- सह्याद्रीनगर ते खेड या महामार्गाच्या कामावर अंधारी ग्रामस्थांनी विरोध दर्शवला. गावात स्वमालकीतील फळझाडांची विनापरवाना तोड केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी काम बंद पाडत ठेकेदाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात लावलेली आंबा, फणस, जांभूळ यांसारखी फळझाडे कोणतीही पूर्वसूचना न देता आणि मोबदला न देता तोडण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून ही कत्तल राजरोसपणे करण्यात आल्याने अंधारीत संताप उसळला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीची बैठक घेत कोळघर ते अंधारी या सुमारे तीन ते चार किलोमीटरच्या टप्प्यातील कामाला तीव्र विरोध दर्शवला. ‘सामान्य शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवून विकास साधायचा असेल, तर तो आम्हाला मान्य नाही,’ अशी ठाम भूमिका बैठकीत मांडण्यात आली.
या बैठकीस उपसरपंच रवी शेलार यांच्यासह माजी सरपंच तानाजी शेलार, मंडळाचे अध्यक्ष डी. के. शेलार, पोलिस पाटील आप्पाजी शेलार व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत अंधारी-कासच्या सरपंच सुरेखा शेलार यांच्या उपस्थितीत लवकरच ग्रामसभा घेऊन अधिकृत ठराव मंजूर करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. दरम्यान, योग्य ती नुकसानभरपाई व प्रशासनाकडून स्पष्ट भूमिका मिळाल्याशिवाय महामार्गाचे काम पुन्हा सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा अंधारी ग्रामस्थांनी दिला आहे.

04627
अंधारी ः स्वमालकीतील झाडे तोडल्याने अंधारी गावातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत कामाला विरोध दर्शवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com