अंत्रोळी येथील महिला शेतकऱ्याचे मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन...
KSR26B01070
कुसूर ः मंद्रूप येथील अपर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करताना महिला शेतकरी व कुटुंबीय.
रस्त्याचा वाद; अंत्रोळीतील महिला
शेतकऱ्याचे मंद्रूपला आंदोलन
.....
कुसूर, ता. ३ : तालुक्यातील अंत्रोळी (द. सोलापूर) येथील रस्ता प्रकरणावरून संतप्त शेतकरी महिलेने दोन दिवसांपासून मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयासमोर कुटुंबासह उपोषणाला सुरुवात केली आहे.
तहसीलदारांच्या स्पष्ट आदेशानंतरही १२ फूटांऐवजी १६ फूट रुंदीचा रस्ता करण्यात आल्याचा आरोप करत संबंधित मंडळ अधिकारी विंचूर यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. तहसीलदारांनी अंत्रोळी येथील गट क्रमांक १७/१ व १७/२ मधून पूर्व–पश्चिम दिशेने १२ फूट रुंदीचा रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले होते. मात्र १९ जानेवारी २०२६ रोजी पोलिस बंदोबस्तात प्रत्यक्षात १६ फूट रुंदीचा रस्ता तयार करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. या कारवाईदरम्यान ऊस पिकासह बोअर पाईपलाईनचे नुकसान झाल्याचा दावा अर्जदार वर्षा नेताजी थोरात व सहकाऱ्यांनी केला आहे.
तसेच रस्त्यासाठी टाकण्यात आलेल्या सुमारे १५० ब्रास मुरुमाच्या रॉयल्टीची कागदपत्रे सादर करावीत, पंचनामा घटनास्थळी का करण्यात आला नाही याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि अनधिकृतपणे तयार केलेला रस्ता हटवावा, या मागण्यांवर आंदोलनकर्ते ठाम आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

