शेतकरी आक्रोश मोर्चाचे सर्वसामान्य शेतकरी,महिला व तरूणांकडून स्वागतच; डॉ. अमोल कोल्हे

केंद्र व राज्य सरकारच्या मोदी विकासरथाला गावागावात विरोध होत असून दंडूके दाखवून रथ हाकलून सरकार विषयी रोष व्यक्त केला जात असल्याची टिका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.
शेतकरी आक्रोश मोर्चाचे सर्वसामान्य शेतकरी,महिला व तरूणांकडून स्वागतच; डॉ. अमोल कोल्हे

कुरकुंभ : राज्यातील मंञी व नेते महाविकास आघाडीच्या शेतकरी मोर्चाला प्रतिसाद मिळत नसल्याची टिका करीत असून आमच्या मोर्चाचे सर्वसामान्य शेतकरी,महिला व तरूणांकडून स्वागत होत आहे. माञ तुमच्या केंद्र व राज्य सरकारच्या मोदी विकासरथाला गावागावात विरोध होत असून दंडूके दाखवून रथ हाकलून सरकार विषयी रोष व्यक्त केला जात असल्याची टिका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

महाविकास आघाडीच्यावतीने खासदार सुप्रिया सुळे व डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाचे बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ,मळद,रावणगाव येथे स्वागत करण्यात आले. तर खडकी येथे झालेल्या सभेत खासदार डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, शिवसेना उध्दव ठाकरे गट व कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. कोल्हे पुढे म्हणाले केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांचे बाराशे कोटी रूपयांचे नुकसान केले आहे. उपमुख्यञी देवेंद्र फडणवीस यांनी निर्यातबंदीनंतर तातडीने शेतकऱ्यांचा कांदा चौवीशे रूपये क्विंटलने खरेदी करण्याचे ट्युट केले. माञ बावीस दिवस उलटूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. कांदा निर्यातबंदी त्वरित उठवावी. शेतकऱ्यांच्या दुधाला पंचवीस रूपये बाजारभाव मिळत असून शासनाने लिटरला पाच रूपये अनुदान देण्याची घोषणा केली.

माञ हे अनुदान फक्त शासकीय संस्थांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्याना मिळणार आहे. त्यामुळे सरकारने शासकीय व खाजगी असा भेदभाव करून दूध उत्पादकांवर अन्याय आहे. शासकीय व खाजगी भेदभाव न करता सरसकट अनुदान द्यावे.यापूर्वी भाजपकडे भ्रष्टाचारी नेत्यांना पक्षात घेऊन वॉशिंग मशिनमध्ये टाकून स्वच्छ केले जात होते.आता आणखी एक मशिन आणली आहे. त्यामध्ये भ्रष्टाचारी नेत्याला टाकलं की भाजप म्हणतो तीच मूर्ती बाहेर येत आहे. विरोधकांकडून माझ्यावर अभिनेता असल्याबद्दल टिका करीत आहे.

माञ मी अभिनयाच्या माध्यमातून छञपती शिवाजी व संभाजी महाराजांचा आदर्श, निष्ठा व जनतेशी असलेल्या इमानाचा इतिहास सांगत असल्याचा अभिमान आहे. माञ इडीच्या भितीने सत्तेत सहभागी होऊन काही लोक ज्या जनतेने निवडून दिले, त्यांच्याशी बेइमानी करीत असल्याची टिका डॉ. कोल्हे यांनी केली.

याप्रसंगी अप्पासाहेब पवार यांनी स्थानिक समस्या मांडल्या. खासदार सुळे व कोल्हे यांचा ग्रामस्थांनी कांदे व दुधाचे कॅन देऊन सत्कार केला. तर अंगणवाडी सेविकांनी मागण्यांचे निवेदन दिले. याप्रसंगी रामभाऊ टुले,योगिनी दिवेकर, वंदना मोहिते, शोभा काळे, सचिन काळभोर,अजित शितोळे, सचिन गायकवाड, सरपंच सविता शितोळे, बापूराव सकुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com