

ऊसदरासाठी ओगलेवाडीत रास्ता रोको
पंचक्रोशीतील १७ गावातील सर्वपक्षीय शेतकऱ्यांचा सहभाग
ओगलेवाडी, ता. २८ ः भीषण दुष्काळ, पाण्याची तीव्र टंचाई, वाढती महागाई व दिवाळी तोंडावर आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, तरी साखर कारखान्यांनी उसाला प्रती टन पाच हजार ५०० रुपये दर त्वरित जाहीर करावा, यासाठी पंचक्रोशीतील १७ गावांतील सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी येथील बाजार चौकात कऱ्हाड- विजापूर राष्ट्रीय महामार्गावर आज रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने शासनास निवेदन देण्यात आले.
कऱ्हाड शहरच्या पोलिस उपनिरीक्षक रेखा देशपांडे यांना निवेदन दिले. त्याची प्रत सह्याद्री कारखाना व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. करवडी येथील सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी अमित डुबल म्हणाले, ‘‘उसास उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावा, साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. दिवाळीपूर्वी उसाचा दर जाहीर करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी.’’
हजारमाची येथील श्रीकांत भोसले म्हणाले, ‘‘उसाला प्रती टन ३५०० रुपये दर दिला जातो. मात्र, टनाला प्रत्यक्षात सहा हजार रुपये खर्च येतो. साखर कारखान्यांनी कारभार काटकसरीने व पारदर्शक केला पाहिजे.’’ राजमाची येथील योगेश डुबल म्हणाले, ‘‘खत, बियाणांचे दर वाढले आहेत. मजुरीही वाढली आहे. शेती साहित्याचे ठिबक सिंचन, पाइपचे दरातही वाढ झाली आहे.’’ वडोली निळेश्वर येथील विजय पवार, करवडी येथील पवन भोसले, वनवासमाची येथील अर्जुन पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
...........
चौकट
...........
घोषणांनी दणाणला परिसर...
‘शेतकरी राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’, ‘शेतकरी व साखर कारखाने वाचले पाहिजेत’, शेतकऱ्यांच्या काळजाचा धूर झाला आहे, उसाला योग्य दर मिळाला पाहिजे, दुष्काळात आता जगायचे कसे आदी घोषणांनी शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला.
W62206
ओगलेवाडी ः रेखा देशपांडे यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देताना अमित डुबल, पवन भोसले, योगेश डुबल, श्रीकांत भोसले, संतोष डांगे. (मुकुंद भट ः सकाळ छायाचित्रसेवा)
-----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.