

SGW26B10326
सांगोला : येथे शनिवारी प्रफुल्ल कदम यांनी शेळ्या-मेंढ्या व इतर जनावरांसह थेट तहसील कार्यालयात प्रवेश केला.
---
जनावरांसह प्रफुल्ल कदमांची
तहसील कार्यालयात धडक
उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलन तीव्र
सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. ३१ : दुष्काळमुक्तीच्या २५ मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी शनिवारी (ता. ३१) शेळ्या-मेंढ्या व अन्य जनावरांसह थेट तहसील कार्यालयात प्रवेश केला. या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले. मागण्या मान्य न झाल्यास सोमवारपासून तहसील कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालय बंद करण्याचा इशाराही कदम यांनी दिला.
दरम्यान, तहसीलदार बाळूबाई भागवत यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कदम यांच्याशी चर्चा केली. संबंधित मागण्यांबाबतचे निर्णय राज्य शासनाच्या स्तरावर होणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बैठक आयोजित करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, मागण्यांबाबत ठोस निर्णय होत नसल्याने कदम यांनी आंदोलनाची तीव्रता वाढविली आहे.
दुष्काळग्रस्त भागाला हक्काचे ११६ टीएमसी पाणी उपलब्ध करून देणे, पशुधनासाठी चारा छावण्या किंवा डेपोऐवजी थेट चारा अनुदान देणे, यांसह २५ मागण्यांसाठी कदम यांनी गुरुवारपासून (ता. २९) सांगोला तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन १५० रुपये, तर लहान जनावरांसाठी १०० रुपये अनुदान थेट पशुपालकांच्या खात्यावर जमा करावे, अशी त्यांची मागणी आहे.
या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, संघटना, शेतकरी, पशुपालक आणि दुग्ध संस्थांचा पाठिंबा मिळत आहे. सोमवारपासून शासकीय कार्यालये बंद करण्याच्या इशाऱ्यामुळे प्रशासन आंदोलनाबाबत काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.