कोल्हापूरः आजऱ्यात भारतीय किसान सभेचा संघर्ष मेळावा

कोल्हापूरः  आजऱ्यात भारतीय किसान सभेचा संघर्ष मेळावा
Published on

शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष

ॲड. दशरथ दळवी ः आजऱ्यात भारतीय किसान सभेचा संघर्ष मेळावा

आजरा, जि. कोल्हापूर ः शेतकरी व ग्रामीण कष्टकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कायदेशीर व संघटनात्मक संघर्ष एकत्रितपणे पुढे नेण्याची गरज आहे. देवस्थान-मठ ट्रस्ट जमीन प्रश्नातील कायदेशीर बाजूने शेतकऱ्यांनी एकजुटीने लढा उभारावा, असे आवाहन ॲड. दशरथ दळवी यांनी केले.
येथील श्रमिक पतसंस्थेच्या सभागृहात अखिल भारतीय किसान सभेचा संघर्ष व लढा मेळावा झाला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ॲड. दळवी अध्यक्षस्थानी होते. किसान सभेचे समन्वयक व जिल्हा सहसचिव संग्राम सावंत, किसान सभेचे आजरा तालुका नेते शिवाजी गुरव, शांताराम पाटील, संजय घाटगे उपस्थित होते. यावेळी अखिल भारतीय किसान सभा, देवस्थान-मठ ट्रस्ट जमीन प्रश्न, शेतकरी-शेतमजूर हक्क आणि राज्य अधिवेशनाची दिशा याबाबत चर्चा करण्यात आली.
सुरेश शिंगटे, ज्योतिराम राणे, श्रावण चौगुले, दत्तात्रय कांबळे, संतोष मासोळे, संभाजी मोहिते, शिवाजी गिलबिले, भगवान सूर्यवंशी, राजेंद्र देशमुख, रामा कांबळे, संतोष माने, सचिन लोहार, शुभम कांबळे आदी उपस्थित होते.

कोट
शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजूर, कामगार, भूमिहीन, बेघर यांच्या समस्या आणि गावठाण वाढ या प्रश्नांबाबत लढा देणार आहे. देवस्थान व मठ ट्रस्टच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क व संरक्षण मिळेपर्यंत निकराचा लढा केला जाईल. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय किसान सभेच्या २४ व्या राज्य अधिवेशनाला आजरा तालुका व परिसरातील शेतकरी-शेतमजुरांनी उपस्थित राहावे.
– संग्राम सावंत, समन्वयक व जिल्हा सहसचिव, किसान सभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com