नगर- शेतरस्त्यांसाठी महिनाभर राज्यात विशेष अभियान शेत-पाणंद रस्त्यांची माहिती संकलित केली जाणार

नगर- शेतरस्त्यांसाठी महिनाभर राज्यात विशेष अभियान शेत-पाणंद रस्त्यांची माहिती संकलित केली जाणार
Published on

शेतरस्त्यांसाठी महिनाभर
राज्यात विशेष अभियान

शेत-पाणंद रस्त्यांची माहिती संकलित केली जाणार

अॅग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर ः शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत बारमाही आणि हक्काचा रस्ता उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेअंतर्गत राज्यात एक सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरदरम्यान विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावागावांतील शेत-पाणंद रस्त्यांची माहिती संकलित केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची माहिती संबंधित तलाठी अथवा ग्रामसेवकांकडे नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात शेत-पाणंद रस्त्याचा प्रश्न कायम सतावत असतो. अनेक कारणाने शेतकऱ्यांना रस्ताचा प्रश्न भेडसावतो. रस्त्याच्या कारणावरून वाद, व सातत्याने संघर्षही केला जात असल्याचे पहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध व्हावेत आणि एकमेकांतील रस्त्यावरून होणारा संघर्षही टाळता यावा यासाठी शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेअंतर्गत विशेष अभियान आयोजित केले आहे.
या अभियानात गावाच्या नकाशावर अस्तित्वात असलेले तसेच नकाशावर नोंद नसलेले, मात्र प्रत्यक्ष वापरात असलेले डी/ई प्रकारातील शेत-पाणंद रस्ते यांची माहिती संकलित केली जाणार आहे. त्यानंतर आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या किंवा नोंदीअभावी विकासापासून वंचित असलेल्या शेतरस्त्यांना प्रशासकीय प्रक्रियेत आणण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अभियानाला राज्यात सुरवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com