Agriculture As Business : शेतकऱ्यांनी शेतीकडे उद्योग म्हणून बघावे; कृषी आयुक्त मांढरे, निर्यातीवर भर देऊन उत्पन्न मिळवावे
Agri Export India : "शेतीकडे उद्योग म्हणून पाहा," असे आवाहन कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी कृषिमाल निर्यात प्रशिक्षण समारोपात केले. शेतकऱ्यांनी उत्पादन, दर्जा आणि पॅकिंग यावर भर देत निर्यातक्षम शेती करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे : ‘शेती ही केवळ दोन वेळच्या जेवणाचे साधन न ठेवता त्याकडे यशस्वी उद्योग म्हणून बघावे,’ असे प्रतिपादन कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी केले. शेतकऱ्याने आपल्या शेतीत तेच पिकवावे ज्यातून आर्थिक फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.