Success StorySakal
पुणे
Success Story : २२ व्या वर्षी 'सीए'; प्रणवकडून इच्छाशक्तीला प्रामाणिकपणे कष्टाची जोड
Inspiring Journey : पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथील प्रणव पोखरकर याने २२व्या वर्षी सीए परीक्षा उत्तीर्ण करत गावाचा व कुटुंबाचा अभिमान वाढवला आहे.
निरगुडसर : कोणतेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती व जिद्दीला आपल्या प्रामाणिक कष्टाची जोड दिल्यास आकाशालाही गवसणी घालता येते, हे पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथील शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या प्रणव सूर्यकांत पोखरकर याने वयाच्या २२ व्या वर्षी दाखवून दिले आहे. त्याने संपूर्ण देशात अवघड समजले जाणाऱ्या सीएची (सनदी लेखापाल) परीक्षा उत्तीर्ण होण्याची किमया केली आहे. त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.