निरगुडसर - कोणतेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती व जिद्दीला आपल्या प्रामाणिक कष्टाची जोड दिल्यास आकाशाला ही गवसणी घालता येते. हे पिंपळगाव-खडकी (ता. आंबेगाव) येथील प्रणव सूर्यकांत पोखरकर यांनी दाखवून दिले आहे..त्याने संपूर्ण देशात अवघड समजले जाणाऱ्या सीएची सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण होण्याची किमया केली आहे. पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथील शेतकऱ्याचा मुलगा प्रणव पोखरकर वयाच्या २२ व्या वर्षी सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याने सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे..प्रगतिशील शेतकरी सूर्यकांत दामू पोखरकर यांचा मुलगा असून, त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण महात्मा गांधी राजगुरुनगर या ठिकाणी झाले. तसेच अकरावी/ बारावीचे शिक्षण बीएमसीसी कॉलेज पुणे या ठिकाणी झाले असून एम कॉम चे शिक्षण गरवारे कॉलेज पुणे या ठिकाणी झाले. मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील प्रणव हा २२ व्या वर्षी सीए झाला आहे..पहिल्यापासून अभ्यासात हुशार असणाऱ्या प्रणवची सीए होण्याची मनोमन इच्छा होती. ती त्याने त्याच्या कष्टाच्या आणि मेहनतीच्या जोरावर सार्थ ठरविले आहे. मंचर बाजार समितीचे संचालक अरुण शांताराम बांगर यांनी संपर्क करून त्याच्या अभिनंदन करून त्याला शुभेच्छा दिल्या तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी प्रणव याची जोरदार मिरवणूक काढून जोरदार स्वागत केले..प्रणव पोखरकर म्हणाला की, मला हे यश मिळवण्यासाठी माझी आई आशा सूर्यकांत पोखरकर, वडील सूर्यकांत दामू पोखरकर, चुलते राजेश व संदीप आणि कुटुंबियांकडून नेहमीच सकारात्मक पाठिंबा मिळाला.तसेच सर्व शिक्षक आणि मित्र परिवाराकडून योग्य असे मार्गदर्शन मिळाले असून त्यांचे मी आभार व्यक्त करतो. या सर्वांमुळेच एवढी अवघड परीक्षा मी या ठिकाणी उत्तीर्ण झालो..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.