

पान १६
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या
घरासमोर धरणे आंदोलन
राजू शेट्टी यांची घोषणा : ऊस दरासाठी शेतकऱ्यांची वज्रमूठ
कोल्हापूर : चालू गळीत हंगामात कर्नाटक आणि महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखरेचा किमान आधारभूत दर प्रति किलो ५० रुपये (५००० रुपये प्रति क्विंटल) करावा, तसेच इथेनॉलचा दर प्रति लिटर ७० रुपये करावा, या प्रमुख मागण्यांसाठी दोन्ही राज्यांतील शेतकरी २९ सप्टेंबरपासून केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी (कर्नाटक) येथील निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरलापूर (ता. मुडलगी, जि. बेळगाव) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केली.
ते म्हणाले, की साखरेच्या टंचाईमुळे केंद्र सरकारने गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू केल्यास उसाची पूर्ण पक्वता न झाल्याने पुढील हंगामात १ ते दीड टक्का रिकव्हरी (साखर उतारा) घटणार आहे. केंद्र सरकारने जरी एफआरपी १०० रुपयांनी वाढविली असली, तरी तोडणी-वाहतूक खर्च वाढल्याने या वाढीचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही.
रयत संघाचे अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी म्हणाले, की गेल्या गळीत हंगामात तुटलेल्या उसाला प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता तत्काळ मिळालाच पाहिजे. २९ सप्टेंबरच्या धरणे आंदोलनापूर्वी केंद्राने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री तसेच शेतकरी संघटनांची तातडीची बैठक बोलवावी.
या वेळी राजेंद्र गड्यान्नावर, सुरेश चौगुले, रमेश पाटील यांच्यासह ‘स्वाभिमानी’ तसेच ‘रयत संघा’चे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.