
esakal
पुणे - 'पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या आणि जमिनीच्या नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे,' असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांचे निसर्ग संकटामुळे होत असलेल्या नुकसानीकडे सरकार गांभीर्याने पाहत असून पंचनामे जलदगतीने सुरू आहेत,' असेही भरणे यांनी सांगितले.