

शिवार फेरीत जिल्हाधिकारी,
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट
अॅग्रोवन वृत्तसेवा
बुलडाणा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित तीन दिवसीय शिवार फेरीच्या अनुषंगाने बुलडाणा कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
शिवार फेरीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनीही डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विविध प्रक्षेत्रांना भेट दिली. त्यांनी पीक प्रात्यक्षिके, कृषी तंत्रज्ञान तसेच जलव्यवस्थापनाशी संबंधित बाबींची माहिती घेतली.
या फेरीत खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, कपाशी, ज्वारी, भरडधान्य, भाजीपाला व फुलपिकांच्या प्रात्यक्षिक प्रक्षेत्रांची पाहणी करण्यात आली. विविध पीक पद्धती आणि उत्पादनवाढीसाठी उपलब्ध तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर देण्यात आली. विद्यापीठातील तंत्रज्ञान शेताच्या बांधापर्यंत आणि शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष वापरापर्यंत पोहोचविणे हा शिवार फेरीचा मुख्य उद्देश आहे. अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडून आधुनिक, शाश्वत व अधिक उत्पन्नक्षम शेतीला चालना मिळेल, असे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी सांगितले.
बुलडाणा ः शिवार फेरीदरम्यान प्रक्षेत्राला भेट देऊन पाहणी करताना जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.