
मंचर : महायुतीतील घटक पक्षांनी विधानसभा निवडणूक प्रचार जाहीरनाम्यात सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असे जाहीर आश्वासन दिले होते. पण आता मात्र हे आश्वासन पाळले जात नसल्याने सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. राज्य सरकारने कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा विश्वास घात केला आहे "अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केली.