आगाखान पॅलेसवर आकर्षक विद्युत रोषणाई

agakhan.
agakhan.

येरवडा : भारतीय पुरातत्त्व विभागाने काही कोटी रूपये खर्च करून आगाखान पॅलेसला रंगरंगोटी व कायमस्वरुपी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त मंगळवारी सायंकाळी संधी प्रकाशात सुद्धा आगाखान पॅलेस उजळून निघाला होता. 

महात्मा गांधींना ब्रिटीशांनी ९ ऑगस्ट १९४२ मध्ये ‘चले जाव’ चळवळीत मुंबई येथे अटक करून येरवड्यातील आगाखान पॅलेसमध्ये नजर कैदेत ठेवले होते. त्यांच्या सोबत कस्तुरबा गांधी, त्यांचे खासगी सचिव महादेवभाई देसाई, सरोजीनी नायडू होत्या. अटक केल्यानंतर सहा महिन्याच्या आता कस्तुरबा आणि महादेवभाईचे निधन झाले. महात्मा गांधींनी स्वत: याठिकाणी शेणामातीची समाधी बनविली होती. 

त्यामुळे आगाखान पॅलेस ऐतिहासिक व राजकीयदृष्टा महत्त्वाचे आहे. दररोज शेकडो पर्यटक या ठिकाणी भेटीसाठी येतात. सहा वर्षांपूर्वी भारतीय पुरातत्त्व विभागाने आगाखान पॅलेसला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन ते ताब्यात घेतले आहे. महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंती निमित्त वर्धा येथील सेवाग्राम, अहमदाबाद येथील साबरमती आश्रम तर येरवड्यातील आगाखान पॅलेसवर कोट्यावधी रूपये खर्च करून सुशोभिकरण व कायम स्वरुपी आकर्षक विद्यत रोषणाई करण्यात आली आहे.

‘‘केंद्र सरकारने आगाखान पॅलेसची रंगरंगोटी व कायमस्वरूपी आकर्षण विद्यत रोषणाई करण्यात आली आहे. याचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे.’’
- गजानन मांडावले, सहायक संरक्षक, भारतीय पुरातत्त्व विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com