

The move is expected to strengthen prosecution in special courts and improve conviction rates in POCSO cases.
पुणे : अत्याचार झालेल्या बालकांना लवकर न्याय मिळावा, यासाठी राज्य शासनाने किमान सात वर्षे अनुभव असलेल्या सरकारी वकिलांना विशेष पॉक्सो सरकारी वकील म्हणून नियुक्त केले आहे. या निर्णयामुळे विशेष न्यायालयांमधील खटल्यांचा अधिक प्रभावी पाठपुरावा होऊन पुरावे सादर करण्यापासून अंतिम युक्तिवादापर्यंतची प्रक्रिया अधिक सक्षम होऊन दोषींना शिक्षा होण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.