
हडपसर : पुणे-सोलापूर महामार्गासह मगरपट्टा-खराडी बायपासवर राबविलेल्या ‘बॅरियर्स व पंक्चर’ प्रयोगामुळे वाहतुकीला वेग आला आहे, मात्र हा प्रयोग राबविताना पादचाऱ्यांचा विचारच केला नसल्याने रस्ता ओलांडण्यासाठी त्यांना करावी लागणारी कसरत जीवघेणी ठरत आहे. वाहतूक महापालिका पथ विभागाने पादचाऱ्यांबाबत दाखविलेल्या या असंवेदनशीलतेबद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.